Raj Thackery : पायाखालची जमीन चाललीय मराठी माणसाला अंदाज आहे का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मराठी माणसांना पुन्हा एकदा संतप्त सवाल करत आपल्या जमीनू वाचण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली. याचा मराठी माणसाला अंदाज आहे का? कारण महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील जमीन ही परप्रांतीयांच्या हातात चालली आहे. तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर […]

Raj Thackery : रेल्वे मंत्रालयात नोकरीची संधी; मराठी तरूण-तरूणींसाठी राज ठाकरे सरसावले

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मराठी माणसांना पुन्हा एकदा संतप्त सवाल करत आपल्या जमीनू वाचण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली. याचा मराठी माणसाला अंदाज आहे का? कारण महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील जमीन ही परप्रांतीयांच्या हातात चालली आहे. तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर ती परत मिळणार नाही. असा धोक्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणासह मराठी माणसांना दिला. ते अलिबाग येथे मनसेच्या जमीन परिषदेमध्ये बोलत होते.

सर्वात लहान बेट नौरुने तैवानशी संबंध तोडले; तैवान चीनचा भाग…

तुम्ही विकत असलेली जमीन कुणाच्या घशात जात आहे. तुम्हाला माहिती आहे का? त्याचा मोबदला तुम्हाला व्यवस्थित मिळतोय का? यामध्ये अलिबाग आणि आसपासच्या गावांमधील जमिनी संपत आल्या आहेत. असंही ते म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की दुसऱ्या राज्यांमध्ये आपण जाऊन जमिनी विकत घेणं काय व्यवसाय देखील करू शकत नाही. कारण तिकडचे नेते देखील तेथील भूमिपुत्रांना प्राधान्य देतात. मात्र आपल्याकडे सर्रास परराज्यातील लोकांना जमिनी आणि घर विकली जात आहेत.

Bhakti Rathore: भक्ती राठोडने केला ‘आंख मिचोली’ मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल खुलासा; म्हणाली…

मात्र अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. मात्र पुढील चार-पाच वर्षात तुमच्याकडे तुमच्या जमिनी राहणार नाही. त्याचबरोबर तुमच्याकडून तुमच्या जमिनी एक रुपयात घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी सरकारी प्रकल्प आल्यानंतर ती जमीन 1000 रुपयात विकली जाते. त्यामुळे हे एक हजार रुपये मोबदला मराठी माणसांना मिळण्याऐवजी तो बाहेरच्या लोकांना मिळत असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच त्यांनी कोकणामध्ये दुसरे किंवा बाहेरचे व्यवसाय सुरू होणार असतील तर भूमिपुत्रांनी त्यामध्ये पार्टनरशिप मागितली पाहिजे. जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्यांचे चिंता मिटेल तुमचं घर आणि जमिनी तुमच्याच राहतील असा सल्लाही यावेळी दिला.

Exit mobile version