मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष नको; पालिका निवडणुकांसाठी ‘राज’ ठाकरेंचे आदेश

  • Written By: Published:
मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष नको; पालिका निवडणुकांसाठी ‘राज’ ठाकरेंचे आदेश

Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून, हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे तसेच स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला उरतरून काम करताना मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही राज ठाकरेंनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित मनसेच्या पदाधिकाऱ्याच मेळाव्यात बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीवर योग्यवेळी बोलेन. आदेशाची वाट पहा असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. आपापसातील हेवेदावे संपवून कामाला लागा असेही आदेशही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

तुम्ही खरे भारतीय असता तर…; भारतीय सैन्यावरील विधानावरून SC ने राहुल गांधींना झापले

BMC मध्ये 100 टक्के मनसे येणार

उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की, यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये BMC मध्ये 100 टक्के मनसे विजयी होणार असल्याचा विश्वास राज यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंसोबतच्या (Uddhav Thackeray) युतीचे काय करायचे ते माझ्यावर सोडा असे सांगत कुणालाही न घाबरता आत्मविश्वासाने कामाला लागा तसेच स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राऊंड उतरून कामाला लागण्याच्या सूचना राज यांनी यावेळी दिल्या.

वीस वर्षांनी जर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग…

वीस वर्षांनी जर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? कोणत्याही प्रकारचा वाद न ठेवता निवडणुकीच्या तयारीला लागा असा मंत्रही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मतदारयादी तपासून घ्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या. मतदारयादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा अशी सूचनाही राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

भयंकर! पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण अन् शिवीगाळ; तरीही गुन्हा नाही, मध्यरात्री दिलं ‘सात पानी’ पत्र

मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको

मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. पण हे काम करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. हिंदी भाषिकांचा द्वेष न करता, आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा.” असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांनी जोर धरला असून, हिंदी भाषिकांचा द्वेष नको या राज ठाकरेंच्या भूमिकेवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube