Raj Thackery on Ajit Pawar and Supriya Sule : लाडकी बहिण आणि लाडके भाऊ एकत्र आले असते. तर दोन्ही पक्ष टीकले असते. त्यासाठी योजनेची आवश्यकता नाही. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी लाडकी बहिण योजनेवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला. आज पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
“निवडून येतील त्यांनाच तिकीट, मनसे नेते सत्तेत बसवायचे”; राज ठाकरेंचा इलेक्शन प्लॅन
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वेगात वाहत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर आता मनसेने देखील मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यासाठी घेतलेल्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत पक्षाची काय स्ट्रॅटेजी असेल याचाही खुलासा केला. याबरोबरच त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर खोचक भाष्य केले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली.
Pune Rains : मोठी बातमी! लवासात दरड कोसळली; चार जण अडकल्याची भीती
दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारकडे नोकरीच्या, पाण्याच्या, आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मात्र त्यांचं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हे सुरू आहे. पण लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजनांची आवश्यकता नाही. राज्य सरकार बहिणींना दीड हजार रुपये महिना देणार. पण तेवढे पैसे आहेत का राज्य सरकारकडे एकीकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत. अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तिरक्या चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाटचाल कशी राहिल याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत. आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. तिकीट मिळालं म्हणजे मी पैसे काढायला मोकळा असा समज कुणीही करुन घेऊ नका. आता मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. यावर काही जण नक्कीच हसतील पण आता हे घडणार म्हणजे घडणार, असा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.