Raj Thackery : रेल्वे मंत्रालयात नोकरीची संधी; मराठी तरूण-तरूणींसाठी राज ठाकरे सरसावले
Raj Thackery : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) हे नेहमीच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत असतात. तसेच ते मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्या म्हणून आवाज उठवत असतात. यावेळी देखील त्यांनी रेल्वे मंत्रालयात (railway ministry ) मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पुढाकार घेतला आहे.
मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्ट CM?; नितीश कुमार यांना घरी बसवत काढणार पगडी
राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हटले आहेत की, ‘भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या 5696 जागा आहेत. 18 ते 30 वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे.
अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण… pic.twitter.com/USOiGptKSO
— Raj Thackeray (@RajThackeray) January 29, 2024
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे.’ असं ते या ट्विटमध्ये म्हटले आहेत. तसेच त्यांनी या जाहिरातीची फोटो देखील त्यामध्ये पोस्ट केला आहे.
CAA Act येत्या 7 दिवसांत देशात लागू होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान
नुकतच राज यांनी नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये मी आज तुमच्यासमोर उभा आहे. गेली अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय. अंगावर केसेस घेतल्या आहेत. मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो. मी आताही तेच सांगत होतो की, मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही त्याच प्रकारचे झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र मराठी शाळा बंद होताना दिसतात. त्याचबरोबर सीबीएससी शाळांमध्ये सर्रास हिंदी आणि इंग्रजीचा वापर केला जातो. त्यामुळे सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी. अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली होती.