Ram Shinde : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती तसेच पीक काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. दुष्काळामुळे आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानीचा पीकविमा मंजूर व्हावा या मागणीसाठी आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडून राज्य सरकारकडे मागणी करण्यात येत होती.
या मागणीला यश मिळाला असून राज्य सरकारने कर्जत (Karjat) जामखेड (Jamkhed) विधानसभा मतदारसंघात 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजूर केला असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.
कर्जत आणि जामखेड तालुक्यात 2023 च्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर पीक काढणीवेळी अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीकविमा मिळावा अशी मागणी होत होती. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या या मागणीचा पाठपुरावा आमदार राम शिंदे यांच्याकडून राज्य सरकारकडे करण्यात येत होता. अखेर आमदार शिंदे यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य सरकारकडून कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजुर करण्यात आला आहे.
12 कोटी 68 लाख रुपयांपैकी राज्य सरकारकडून जामखेड तालुक्यासाठी 7 कोटी 8 लाख 36 हजार 446 रूपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे तर कर्जत तालुक्यासाठी 5 कोटी 60 लाख 24 हजार 793 रूपयांचा पीकविमा मंजुर करण्यात आला असून मंजूर झालेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची देखील माहिती आमदार शिंदे यांनी दिली आहे.
तसेच येत्या काही दिवसात पिक कापणी प्रयोगावरती आधारित पिक विमा मंजूर करण्यात येणार असून याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.
… म्हणून सीबीआयकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक, अडचणीत होणार आखणी वाढ?
माहितीनुसार, मूग, उडीद अंडी सोयाबीनसाठी तर कर्जत तालुक्यात मक्का आणि उडीद या पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे.