महायुतीची पिछेहाट झाली हे खरं; राम शिंदेंची कबुली, सर्व काळजी घेऊन विधानसभेला सामोरं जाणार

महायुतीची पिछेहाट झाली हे खरं; राम शिंदेंची कबुली, सर्व काळजी घेऊन विधानसभेला सामोरं जाणार

Ram Shinde : लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली हे खर आहे. या पराभवानंतर त्यावर चिंतन-मंथन होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रभावी विरोध

लोकसभेत एक नरेटीव्ह तयार करण्यात आला. त्याला प्रभावी काऊंटर करण्यात आलं नाही. विरोधक त्यामध्ये यशस्वी झाले असं म्हणत या पराभवातून आता पुढे गेलं पाहिजे अशी भावनाही राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच, जातीचे किंवा विकासाचे काय समीकरण आहे हे पाहून लोकसभा निवडणूक झाली असंही ते म्हणाले.

सर्व मागण्यांवर विचार

मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सविस्तर चर्चा झाही आहे. सध्याही त्यावर विचारविनीमय सुरू आहे. हे सगळ होत असताना जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार गंभीर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी योग्य तो निर्णय घेतील असंही राम शिंदे यावेळी म्हणाले आहेत. तसंच, जरांगे यांच्या सर्व मागण्यांवर विचार सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ओबीसी हा डीएनए

सर्व समाजाला महायुती न्याय देणार आहे. त्यामुळे ओबीसी हा आमचा डीएनए आहे असं भाजप म्हणत असेल तर ओबीसी नेत्यांकडे सरकार दुर्लक्ष कसं करेल असा प्रतिप्रश्नही राम शिंदे यांनी यावेळी केला. तसंच, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजप नेते आहेत. त्यामुळे तेच मुख्य ठिकाणी असतील असंही राम शिंदे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube