पीकविमा योजनेचे 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरीत, शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार

पीकविमा योजनेचे 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरीत, शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार

Crop Insurance Updated : राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस झाला. मात्र, तरीही मराठवाडा, विदर्भात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले. त्यामुळं पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना विम्याच्या (Crop Insurance) रकमेच्या 25 टक्के भरपाई मिळणार होती. मात्र, शासनाने एक रुपया पीकविमा अंतर्गत विमा कंपनीला (insurance company) अद्याप 1,551 कोटी रुपये दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नव्हती. दरम्यान, राज्य सरकारने (State Govt) ‘एक रुपया पीक विमा’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वाट्याचे 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले.

मुंबईकरांना दिलासा! CNG-PNG च्या दरात कपात, मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती दर घटले? 

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पिकविमा योजना सुरू केली. त्याअंतर्गत यंदा एक कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. राज्य सरकारने ‘एक रुपया पीक विमा’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वाट्याचे 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत. त्यामुळे पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झालेल्या सुमारे चार कोटी शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणत: २० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा केली जाईल.

यंदाच्या खरीप हंगामात राज्यात 1 कोटी 50 लाख 97 हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली. परंतु, पेरणीनंतर अवघ्या काही दिवसांतच पावसाने दडी मारली. पावसाने खंड पाडल्यानं आठशेहून अधिक महसूल मंडळात पिकांचे नुकसान झाले. पिके करपली होती,

राज्यातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत 25 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या 40 टक्केही पाऊस झालाला नाही. त्यावेळी 456 महसूल विभागातील पावसाचे खंड हा एका महिन्याचा होता. तर दुसरीकडे 588 प्रभागात 15 ते 21 दिवस पाऊस पडला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील 15 जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईबाबत अधिसूचना जारी केली आहे. परंतु, विमा कंपनीला सरकारकडून ‘एक रुपया पीकविम्याची रक्कम मिळालेली नव्हती. त्यामुळं पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करू शकल्या नाही.

दरम्यान, आता राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांना पैसे वितरीत केले. त्यामुळं आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube