Download App

अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान

  • Written By: Last Updated:

President’s Police Medal : पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर (Rashmi Karandikar) यांचा राष्ट्रपती पदकाने (President’s Police Medal) सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर याचं पहिलं नाव आहे. तर देशभरातील एकूण 753 अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झालं आहे. राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे रश्मी करंदीकर यांचे आप्तेष्ट आणि विभागातील अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

IND vs ENG : इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज सचिनलाही भारी; फक्त 29 धावा केल्या अन् बनला नंबर वन 

महाराष्ट्रातील रश्मी करंदीकर, संजय जाधव, राजेश्वरी कोरी, रवींद्र चारदे, अरुण परिहार, अमित तिमांडे आणि योगेश जाधव यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रश्मी करंदीकर सध्या अतिरिक्त पोलीस महासंचाल म्हणून कार्यरत आहेत.

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना करंदीकर यांनी सांगतिलं की, अशा प्रकारे सन्मानाचे पदक जाहीर झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाते. हा पुरस्कार मिळाल्याचे आनंद आणि समाधान असून पुढील काळात आणखी जोमाने सेवा करणार असल्याचं करंदीकर यांनी सांगितलं.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, कर्नाटकात भाजपकडून मोठा धक्का 

त्या म्हणाल्या, पोलीस खात्यात कोणी भरती झाल्यावर ती व्यक्ती अक्षरश: मातीच्या गोळ्यासारखी असते! त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार पहिला वरिष्ठ अधिकारी तिला ठाकून ठोकून घडवण्याच, आकार देण्याची प्रक्रिया सुरू करतो, तेव्हाच त्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार प्राप्त होतो. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्यासारखे कर्तव्यत्पर असतील तर? प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून मी त्यागी मॅडमच्य हाताखाली रूजू झाले आणि माझा उमेदवारीचा काळ कसा असेल ते लगेच माझ्या लक्षात आलं, असं रश्मी करंदीकर म्हणाल्या.

रश्मी करंदीकर या उत्तम आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्यासह राज्यातील 78 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे. यामध्ये रश्मी करंदीकर यांची निवड करण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज