Ratan Tata Death Live Updates : उद्योगरत्न रतन टाटा (Ratan Tata ) यांचं दीर्घ आजाराने काल निधन झालं. मुंबईतील वरळीमधील शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तर देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. राजकीय क्षेत्रासह बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली होती.
#WATCH | Last rites of veteran industrialist Ratan Tata, being performed with state honour at Worli crematorium in Mumbai pic.twitter.com/08G7gnahyS
— ANI (@ANI) October 10, 2024
टाटा मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व – फडणवीस
रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हते तर ते मोठ्या मनाचे व्यक्ती होते, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगरत्न रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केलीयं. दरम्यान, दीर्घ आजाराने रतन टाटा यांचे काल निधन झालं. मुंबईतील वरळीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडत आहेत. या अंत्यसंस्कार विधीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हते तर ते मोठ्या मनाचा व्यक्ती होता.
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार रांगडी प्रेमकहानी
भारताचा कोहिनूर हरपला – मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांचा उल्लेख ‘भारताचा कोहिनूर हरपला’ या शब्दांत केलायं. शिंदे म्हणाले, रतन टाटांची बातमी ऐकून वेदना झाल्या, ही दुखद घटना आणि मनाला चटका देणारी आहे, एक अनमोल दुर्मिळ रत्न हरपलं असून भारताचा कोहिनूर हरपला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
‘रतन टाटा उद्योगरत्न’ पुरस्काराची घोषणा..
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने उद्योग रत्न पुरस्काराबद्दल मोठा निर्णय घेतला असून, येथून पुढे राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा उद्योग रत्न पुरस्कार ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ पुरस्कार म्हणून दिला जाणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या – राज ठाकरे
भारतातील उद्योग क्षेत्रातील उद्योगरत्न रतन टाटा यांच्या निधनानंतर किमान त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ घोषित व्हायला हवा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीयं. यासंदर्भात राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.
