Download App

Sangali NEET Exam : मुलींच्या तपासणीवर चाकणकर भडकल्या; म्हणाल्या या अधिकाऱ्यांना…

Rupali Chakankar :  सांगलीत (Sangli News) नीट परीक्षेच्या दरम्यान (Neet Exam) एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले असल्याची तक्रार उमेदवारांनी पालकांककडे केली आहे. (NEET Exam Controversy) त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.  यावर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाष्य केले आहे.

देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमानी समोर आणले आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचं झाल्यास, सांगलीमध्ये विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणं अशा तक्रारी आल्या आहेत.तक्रार दाखल झाल्याने सांगली मधील प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! पैसे घेऊन नापासांना पास केले; पुण्यात बनावट विद्यापीठाचा भांडाफोड

परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

Sanjay Raut : मणिपूर पेटलयं अन् मोदी कर्नाटकात, बजरंग बली त्यांच्या डोक्यात गदा मारणार, राऊतांचे वार

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडत आहे. या परीक्षा पार पडत असताना सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी अगोदर त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावले असल्याचा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

Tags

follow us