Download App

Salman Khan Threat: वसीम चिकनाला पोलिसांकडून अटक; बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड

छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करत होता.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar News : अभिनेता सलमान खानला धमकावणाऱ्या आणि मोठी दहशत निर्माण करणाऱ्या बिश्नोई गँगचे छत्रपती संभाजीनगरचं कनेक्शन समोर आलय. बिश्नोई गँगसाठी रेकी करणं, शस्त्रांच्या डीलिंग करण याची जबाबदारी वसीम चिकना याला देण्यात आली होती. याबाबतची माहती पनवेल पोलिसांना मिळाली. (Salman Khan Threat) त्यानंतर त्यांनी तपासाचे चक्र फिरवत वासिमला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. ( Bishnoi Gang) अटक करण्यात आलेला वसीम हा जालना जिल्ह्यातील असून, त्याचं आता छत्रपती संभाजीनगर शहराचे बिष्णोई गँग कनेक्शन उघड झालं आहे.

देशभरामध्ये मोठी दहशत  काँग्रेस नेत्यांची झालेली एकजूट काहीजणांना बघवली नाही; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडं?

खून, खंडणी, प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरण यासह बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीव मारण्याची धमकी देणारी लॉरेन्स बिश्नोई गँग देशभरात वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असते. या गँगची देशभरामध्ये मोठी दहशत आहे. याच बिश्नोई याचे आता छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करणं, शस्त्रांच्या बिलिंग हे काम छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना हा करत होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष

सलमान खानच्या घरावर रेकी करण्यासाठी या परिसरामध्ये रूम शोधण्याचं काम त्याने सांगितले होतं अशी माहिती सूत्रांच्या आधारे पोलिसांना मिळाली. शहरातील जालानगर परिसरातील अलंकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पनवेल पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतलं आहे. सलमान खानला धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालत गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.

क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या मदत भाजपला अहंकारी म्हणणाऱ्या संघनेत्याचे घूमजाव; म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या

पोलिसांनी सलमान खान धमकी प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता या गुन्हेगारांकडून वसीम चिकना याचं नाव समोर आलं होतं. या माहितीच्या आधारे पनवेल पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत छत्रपती संभाजीनगर पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या मदतीने जालानगर परिसरामध्ये राहणाऱ्या वसीम चिकना याला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असून, यामधून महत्वाची माहिती समोर येईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

 

follow us