भाजपला ‘अहंकारी’ म्हणणाऱ्या संघनेत्याचे घूमजाव; म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या…

भाजपला ‘अहंकारी’ म्हणणाऱ्या संघनेत्याचे घूमजाव; म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या…

Rss Leader Indresh Kumar on BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी भाजपला खोचक टोला (RSS on BJP) लगावला होता. अहंकाऱ्यांना प्रभू श्रीरामांनी 241 वरच रोखलं असं वक्तव्य त्यांनी राजस्थानातील एका कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकारणात मोठा गदारोळ उडाला होता. विरोधकांना भाजपला टार्गेट करण्याची आयतीच संधी मिळाली. या वक्तव्यातून आरएसएस आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी टीका केली होती. पण, आता आपल्या वक्तव्याने वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर इंद्रेश कुमार यांनी यू टर्न घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) तिसऱ्या कार्यकाळात देश वेगाने प्रगती करो. ज्यांनी रामाचा संकल्प घेतला ते आता सत्ते आहेत, असे नवे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे.

याआधी राजस्थानातील कनोटा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे म्हटले. त्यांना प्रभी श्रीरामांनी 241 जागांवरच अडवले. त्यांचा (भाजप) अहंकारच यासाठी कारणीभूत ठरला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा नामोल्लेख टाळत ज्यांनी प्रभू रामाला विरोध केला. त्यांनाही 243 वर मर्यादीत राहावं लागलं. हाच देवाचा न्याय असतो, असे इंद्रेश कुमार म्हणाले होते.

“अहंकाऱ्यांना प्रभू श्रीरामांनी 240 वरच रोखलं” आरएसएस नेत्याचा भाजपला खोचक टोला

ज्यांनी रामाची बाजू घेतली ते आज सत्तेत

त्यांच्या याच वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या होत्या. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच इंद्रेश कुमार यांनी काल इंदोरमध्ये सारवासारव केली. ते म्हणाले, ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर फेकले गेले. पण, ज्यांनी रामाची बाजू घेतली, त्यांचा संकल्प पूर्ण केला ते आज सत्तेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती होईल असा विश्वास प्रत्येकांत निर्माण झाला आहे.

दरम्यान, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजप नेतृत्वाचे कान टोचले होते. निवडणूक प्रचारा दरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती, असे निरीक्षणही नागपूरमधील एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी नोंदविले आहे. तर आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनाइजरनेही भाजपच्या बॅफफूटला जाण्याच्या कारणांवर सविस्तरपणे एक लेख लिहित भाजप नेतृत्वाला आरासा दाखविला आहे. भाजपला अतिआत्मविश्वास नडला, असे स्पष्टपणे लेखात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना गांभीर्य आहे का?; त्यांची गरज संपली का?, RSS च्या टिपण्णीवरुन ठाकरेंची टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube