Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त भाषण (controversial speech)केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली.
संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन (independence day) दुःखाचाही आहे. त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा, असं संभाजी भिडे म्हणाले, त्यावरुन आता विरोधकांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडकडून जाहीर निशेध करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर (Thane Collector Offices)भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. (sambhaji-brigade-aggressive-on-sambhaji-bhide-speech)
70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’
संभाजी भिडेंनी स्वातंत्र्यावर बोलताना महात्मा गांधींवर निशाणा साधत जोरदार टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ सुरु असतानाच महात्मा गांधी पहिल्या दिवसापासूनच ब्रिटिशांची पाठराखण करणारे वर्तन करत आले. महात्मा गांधींची स्वातंत्र्य मिळवून देतो म्हणणारी वक्तव्य म्हणजे लफंगेगिरी होती. अशा प्रकराची वादग्रस्त विधानं केली.
बॅंकेच्या प्रत्येक शाखेत देवेंद्र फडणवीसांचे तैलचित्र लावा, सदावर्तेंचे बॅंकेला निर्देश
त्याचबरोबर राष्ट्रगीतावरही आक्षेप घेत हे आपलं राष्ट्रगीत नसल्याचं म्हटलं आहे. जन, गण, मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांना सुचलं होतं. काय लायकीचे लोकं, काय लायकीचं स्वातंत्र्य अन् काय झेंडावंदन असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत 1947 मध्ये मिळालेलं ते हांडगं स्वातंत्र्य असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मानू पण फक्त दखलपात्र म्हणून, असं ते म्हणाले आहेत.
संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त भाषणावरुन आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या भाषणावर संभाजी ब्रिगेडने टीका केली आहे. संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त भाषणावरुन शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या भाषणावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी टीका केली.
संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर आमदार अहिर म्हणाले की, ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसताना अशी वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वळवण्याचं काम केलं जात असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली.