Download App

ठरलं! सांगलीत विजयासाठी विशाल पाटील मतदारांकडे ‘लिफाफा’ घेऊन जाणार; आयोगाने दिलं चिन्ह

  • Written By: Last Updated:

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अर्ज मागे न घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीतून विजय मिळावा यासाठी मतदारांकडे विशाल पाटील लिफाफा घेऊन मतदारांच्या दारात जाणार आहेत. (Vishal Patil Gets Liphafa Symbol For Sangli Loksabha)

विशाल पाटील लढले तर पाठिंबा देऊ; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं!

राऊतांच्या दाव्याला तडा

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस सांगलीच्या प्रचारात दिसेल असे विधान केले होते. मात्र, त्यानंतरही आज (दि.22) विशाल पाटलांनी सांगलीतून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यानंतर आता विशाल पाटलांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढत होणारच हे चित्र स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील माघार घेऊन प्रचारात सहभागी होतील असा विश्वास राऊतांनी सांगलीत बोलून दाखवला होता. मात्र, आता विशाल पाटलांनी माघार न घेतल्याने एकप्रकारे राऊतांच्या गाव्याला मोठा तडा गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तुमच्यात साखर कारखाना चालवण्याची धमक नाही; सांगलीत विशाल पाटलांवर अजित पवारांचा घणाघात  

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत

विशाल पाटील काही आमचे शत्रू नाहीत. त्यांच्या मनात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रेम आहे. चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगलीतील वातावरण तुम्ही सर्वांनी पाहिले. अर्ज भरताना आघाडीमधील सर्व नेते उपस्थित होते. विश्वजीत कदम यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, दोन दिवसात काँग्रेस चंद्रहार पाटलांसाठी मैदानात उतरेल. तसेच पुढच्या सभेला विश्वजित कदम हे देखील मंचावर दिसतील असे संजय राऊत म्हणाले होते. विशाल पाटलांशी आमचा यावेळेला उत्तम संवाद असल्याचेही राऊत म्हणाले होते.

छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?

सांगलीच्या तख्यासाठी तीन पाटील मैदानात

सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस होता. विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यापासून त्यांनी तो माघारी घ्यावा यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, त्यानंतरही या नेत्यांना विशाल पाटलांचे मन वळवण्यात अपयश आले. त्यानंतर आता आयोगाने विशाल पाटलांना निवडणूकासाठी चिन्हदेखील दिले आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तख्यात आता भाजपचे संजयकाका पाटील, ठाकरेसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील या तीन पाटलांमध्ये कडवी लढत होणार असून, तिघांपैकी कोणते पाटील सांगलीचं मैदान मारणार याचं उत्तर 4 जूनला मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज