Sanjay Raut On Shinde Goverment : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप व शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातील होणाऱ्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ज्यांना धर्मांधतेचे राजकारण करायचं आहे अशांना एक चटक लागली आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक दंगलीमागे गेल्या साधारण दहा वर्ष मागे राजकारण आहे आणि राजकीय हात आहेत. ज्यांना धर्मांधतेचे राजकारण करायचं आहे अशांना एक चटक लागली आहे. महाराष्ट्रामध्ये आजही भाजप महानगरपालिका निवडणूका घ्यायची हिंमत दाखवत नाही. कर्नाटकात बजरंग बली, हनुमान चालीसाचे तंत्र चालल नाही, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना औरंगजेब घ्यावा लागला. हिंदुत्वाच्या नावाने उन्माद तयार करायचा जे हिटलरपेक्षा भयंकर आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
‘.. तर आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही’; मुंब्र्यातील धर्मांतराच्या दाव्यावर आव्हाडांचा संताप
या सरकारने आम्ही कसं संभाजीनगर आणि धाराशिव केलं याच्या टिमक्या वाजविल्या होत्या ना आता त्यांच्या लोकांनी हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही पुन्हा पुन्हा संभाजीनगरला औरंगाबाद म्हणतात धाराशिवला उस्मानाबाद अधिकृतपणे म्हणत आहात तर, तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? तुम्हाला औरंगजेबाबद्दल प्रेम का आलं याचं उत्तर द्या. भाजपाच्या काही उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो, तुमच्या मनातील औरंगजेब आधी काढा, असे राऊत म्हणाले.
PM मोदींचे OSD झाले देशाच्या अर्थमंत्र्यांचे जावई; चर्चा मात्र सीतारामन कुटुंबीयांच्या साधेपणाची!
दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावरदेखील भाष्य केले. ते कुटुंबासह गेले असतील, तिथे बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे. डोकं शांत करायला गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे स्फोट होणार आहेत आणि त्या संदर्भात अमित शाह यांनी त्यांना जे आदेश दिले आहेत, मंत्रिमंडळ बदलाचे आणि काही मंत्र्यांना वगळण्याचे ते ओझं घेऊन ते काश्मीरला गेले असतील, असा टोला त्यांनी लगावला. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला तर, मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना या अमित शहा यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे, असे ते म्हणाले.