‘.. तर आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही’; मुंब्र्यातील धर्मांतराच्या दाव्यावर आव्हाडांचा संताप
Jitendra Awhad : गाझियाबाद येथील एका अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अधिकाऱ्याच्या या दाव्यावर प्रत्युत्तर देत धर्मांतरण केल्याचे सिद्ध केल्यास आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिले आहे.
आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की चारशे धर्मांतरण झाले आहेत. सांगा यातलं सत्य काय आहे. आम्ही तर सत्याचीच मागणी करत आहोत. जर चारशे धर्मांतर झालेले असतील तर मी असे मानेल की मुंब्र्यासाठी मी काहीच केले नाही. मी लोकांना बदलू शकलो नाही. जर चारशे लोक असतील तर मी सांगतो की मी आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही.
मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांन मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे सांगितले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल डॉ. आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, राज्यात सध्या धार्मिक विद्वेषातून शासर पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझियाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाल्याचे जाहीर केले. हा मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा प्रकार तर आहेच. शिवाय हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
.. तर मुंब्रा बंद करू
आपले स्पष्ट म्हणणे आहे की महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्राला सांगावे की गाझियाबादमधून पोलीस अधिकाऱ्याने जे सांगितले ते खरे आहे की खोटे? अन्यथा 1 जुलैला मुंब्रा बंद करून हिंदू-मुस्लिम यांचा एकत्रित मोर्चा काढू, असा इशारा आव्हाड यांनी दिला.