Sanjay Raut on PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी जरी म्हणत असले की, मी माणूस आहे तरी मी त्यांना माणूस माणत नाही. ते भगवान आहेत. त्यांनी स्वत: तसं घोषीत केलेलं आहे. (Modi ) ते कृष्णाचे तेरावे अवतार आहेत अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक वक्तव्यावरून टोला लगावला आहे. ते माध्यमांसमोर बोलत होते.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखिल कामथ यांच्याबरोबरचा पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. कामथ यांच्या पॉडकास्टच्या या भागाचं नाव ‘पीपल विथ द प्राईम मिनिस्टर’ असं आहे. दरम्यान, या पॉडकास्टमध्ये सुरुवातीलाच ‘मी पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे, असं पंतप्रधानांनी म्हणाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलेल्या भाषणाचाही उल्लेख केला, त्यावर बोलताना ते म्हणाले ‘ माणसाच्या जीवनात चुका अपरिहार्य आहेत. मीही चुका केल्या असतील. मी एक माणूस आहे, देव नाही’, असं ते म्हणाले.
CM फडणवीसांनी नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, विजय वडेट्टीवारांकडून कौतुक
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. जागावाटपात उशीर झाल्याने निवडणुकीत पराभव झाला असे विधान काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले होते. जागावाटपात जो घोळ झाला त्याला नाना पटोले आणि संजय राऊत जबाबदार असल्याचा त्यांचा रोख होता. या मुद्द्यावरच भाष्य करताना संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.