हा माझ्यासाठी रोमांचक अनुभव; देवमाणूसच्या स्टार-स्टडेड कलाकारांमध्ये सुबोध भावे सहभागी

हा माझ्यासाठी रोमांचक अनुभव; देवमाणूसच्या स्टार-स्टडेड कलाकारांमध्ये सुबोध भावे सहभागी

Devmanus movie : तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीममध्ये आता अभिनेता सुबोध भावा सामील झाला आहे. (Devmanus movie) अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे ज्यात आकर्षक आणि उच्च दर्जाचे नाटक संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरील प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि अनुभवायला मिळेल.

बालगंधर्व, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटांतील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला सुबोध भावे, ज्याची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे, जो नेहमी आपल्या प्रत्येक भूमिकांमध्ये स्वतःला बुडवून घेण्याची क्षमता ठेवतो. कॉम्प्लेक्स, स्टेबल यांसारख्या विविध लेवलच्या पात्रे साकारण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल त्यांचं अनेकदा कौतुक झालं आहे. हा समावेश आणि योगदान नक्कीच चित्रपटाच्या कथेला एक नवीन आयाम देईल.

देवमाणूसच्या कलाकारांसोबत सामील होण्याबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणाला , मला यापूर्वी दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. परंतु, देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे.

या अविश्वसनीय चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकढून कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहण्यासाठी मी आतुर आहे असं सुबोध भावे म्हणाला आहे. देवमाणूस या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एक प्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या सिनेमासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube