Download App

IT ची नोटीस, दानवेंचे गंभीर आरोप अन् फडणवीसांकडून चौकशी; संजय शिरसाट कसे फसले?

अंबादास दानवेंनी हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. दानवेंच्या आरोपांची फडणवीसांनी दखल घेतली.

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आयकर विभागाने (Income Tax Department) त्यांना नोटीस पाठवली. 2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर 2024 साली तुमची संपत्तीत वाढ कशी झाली?, याचे स्पष्टीकरण आयकर विभागाने मागवले. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) हॉटेल व्हिट्स खरेदी (VITS Hotel) प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. दानवेंच्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गंभीर दखल घेतल्यानं शिरसाट चांगलेच अडचणीत आले.

सरकारी कंपनीत काम शिकण्याचा दरमहा मिळणार पगार, अप्रेटिंस पदाचे 350 जागा, आजच करा अर्ज 

दानवेंचे आरोप काय?
छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांचा सहभाग होता. या हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये आहे, पण ते फक्त 67 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा आरोप करत दानवेंनी केला.
शिरसाट यांनी या प्रकरणातून माघार घेत निविदा रद्द केली, परंतु फडणवीसांनी या प्रकऱणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळं शिरसाटांवर दबाव वाढवला.

शिरसाटांच्या मालमत्तेत १३ पट वाढ
२०१९ आणि २०२४ च्या प्रतिज्ञापत्रांनुसार, शिरसाट यांच्या मालमत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.
जंगम मालमत्ता: १.२१ कोटी रुपयांवरून (२०१९) १३.३७ कोटी रुपये (२०२४)
स्थावर मालमत्ता: १.२४ कोटी रुपयांवरून १९.६५ कोटी रुपये
सोने: १.६ लाख रुपयांवरून १.४२ कोटी रुपये
ठेवी: ५ लाख रुपयांवरून ८१ लाख रुपये
वाहने: ८५ लाख रुपयांवरून १.८ कोटी रुपये

दरम्यान, मालमत्तेत झालेली ही १३ पट वाढ आयकर विभागाच्या निदर्शनास आली असून या संदर्भात स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही शिरसाट यांच्या बेकायदेशीर मालमत्ता खरेदीचे कागदोपत्री पुरावे सादर करत ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशीची मागणी केली होती. जलील यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवलीय.

मोठी बातमी! विरोधकांच्या विरोधाला न जुमानता जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर 

त्यानंतर आता शिरसाट यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ते सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहेत. तसेच शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसते आहे. खासदार संजय राऊतांनीच हा व्हिडीओ समोर आणलाय. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिरसाट यांना ईडी आणि आयकर विभागाकडून नोटिसा मिळाल्यानंतर आणि फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह आता समोर येऊ लागलाय. काहींच्या मत आहे, शिरसाटांचा गेम करून फडणवीस हे शिंदे गटावर दबाव वाढवण्यासाठी ही खेळी खेळत आहेत.

दरम्यान, संजय शिरसाटांची सगळ्या बाजूने कोंडी झालेली आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात आली असून या चौकशीतून काय निष्पन्न होते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us