विट्स हॉटेल ते पैशांनी भरलेली बॅग; संजय शिरसाट अन् भानगडींचा इतिहास एकदा वाचाच…

विट्स हॉटेल ते पैशांनी भरलेली बॅग; संजय शिरसाट अन् भानगडींचा इतिहास एकदा वाचाच…

Sanjay Shirsat : मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री विविध कारणांनी वादात अडकले आहेत. आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण केल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा घरातील पैशाच्या बॅगेचा कथित व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळ शिरसाट चांगलेच चर्चेत आलेत. दरम्यान आतापर्यंत कोणकोणत्या वादांमुळे शिरसाट चर्चेत आले, ते जाणून घेऊया.

आमदार संजय गायकवाडवर कारवाईस दिरंगाई, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल 

संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर आरोप झाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी विट्स हॉटेल खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिरसाटांवर झाला होता

विट्स हॉटेल खरेदीचा वाद
छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांचा सहभाग होता. या हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये आहे, पण ते फक्त 67 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
यानंतर शिरसाटांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केलं. मात्र, विरोधकांनी हा विषय चांगलाच लावून धरलाय. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर शिरसाट यांच्यावर आयकर खात्याची वक्रदृष्टी पडली आणि आयकर विभागानं शिरसाटांना नोटीस पाठवलीय.

नवरा बायकोच्या भांडणात त्रिशूल लागून चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला 

शिरसाट यांचा कथित व्हिडिओ व्हायरल..
त्यांनंतर आता शिरसाट यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ते सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहेत. तसेच शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसते आहे. खासदार संजय राऊतांनीच हा व्हिडीओ समोर आणलाय. प्रसारमाध्यमांच्या हाती हा व्हिडिओ लागला असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.

शेंद्रा जमीन प्रकरण
संजय शिरसाट यांनी नियम डावलून आणि पदाचा गैरवापर करून शेंद्रा एमआयडीसीमधील पाच एकर जमीन स्वस्तात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. ही जमीन त्यांच्या मुलगा सिद्धांत आणि इतर कुटुंबीयांच्या नावावर नोंदवण्यात आली. या जागेवर 105 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा प्रकल्प उभा राहणार होता. पण शिरसाटांनीमंत्रिपदाचा गैरवापर करून या जागेवरील आरक्षण उठवले. त्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC)ने लिलाव न करता ही जमीन दिल्याचं सांगितलं जातं.

सिद्धांत शिरसाटांवर गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वीच एका विवाहित महिलेने सिद्धांत शिरसाट यांच्यावर शारीरीक छळाचा आरोप केला होता. तसेच मारहाण आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचाही आरोप केला होता. महिलेनं 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पण शिरसाट हे मंत्री असून त्यांनी आपली शक्तीपणाला लावली आणि हे प्रकरण थंड केल्याचा आरोप महिलेच्या वकिलांनी केलाय.

दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे शिरसाट विरोधकांचे टार्गेट बनत आहे. या आरोपांमुळे शिरसाटांचे मंत्रीपदही धोक्यात आले असून शिरसाटांचे मंत्रीपद जाणार की राहणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube