नवरा बायकोच्या भांडणात त्रिशूल लागून चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला

Pune Crime News : पुण्याच्या दौंड तालुक्यातील (Daund taluka) केडगावमध्ये नवरा-बायकोच्या भांडणातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नवरा-बायकोमधील भांडणात ११ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. बायकोने नवऱ्याला फेकून मारलेला त्रिशूल हा तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवधूत मेंगवडे (Avadhoot Mengwade) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदण्यात आला.
बीडच्या गुन्हेगारीचा रोज एक अंक; जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची मारहाण, तरुण रक्तबंबाळ
प्राथमिक माहितीनुसार, नितीन मेंगवडे हे केडगाव येथे राहतात. त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, भांडणा दरम्यान बायकोने नवऱ्याला शेजारी असलेला त्रिशूल फेकून मारला. पण तो त्रिशूल बाजूला भावजयेच्या कडेवर असलेल्या मुलाला लागला. हा त्रिशूळ लागल्याने अवधूत गंभीर जखमी झाला.
जखमी अवधूतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नवरा-बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
Infinix Hot 60 5G+ अखेर बाजारात लॉन्च, मस्त फीचर्ससह देणार iQOO ला टक्कर, किंमत फक्त…
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भाग्यश्री मेंगवड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नितीन मेंगवडे आणि पल्लवी मेंगवडे यांच्या ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांना काहीतरी वेगळाच संशय येतोय. हा प्रकार कोणत्या अंधश्रद्धेतून घडला आहे का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
भाग्यश्री मेंगवडेंनी तक्रारीत काय म्हटलं?
भाग्यश्री मेंगवडेंनी सांगितले की, माझे दीर नितीन मेंगवडे आणि त्यांची पत्नी पल्लवी मेंगवडे यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. यावेळी मी माझ्या मुलाला कडेवर घेऊन त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी गेले. पण पल्लवीने नितीनला फेकून मारलेला त्रिशूळ माझ्या मुलाच्या डोक्यालाा लागला आणि त्याचा मृत्यू झाला, असं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.