Santosh Deshmukh’s murder brutal video in hands of CID : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या दरम्यान आता सीआयडीच्या हाती देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
IIT बाबाकडे सापडला गांजा, जयपूर पोलिसांनी केली अटक, तात्काळ जामीनही मंजूर..
WhatsApp Image 2025 03 03 At 9.42.26 PM
हे फोटो अत्यंत क्रूर दिसत आहेत. जे पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी हा व्हिडिओ लाईव्ह शेअर करण्यात आला होता. आरोपींच्या एका मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. सीआयडीच्या हाती आता हेच व्हिडिओ लागले आहेत. जे पुरावे म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत.
Vidhan Parishad Election : निवडणूक बिनविरोध होणार ? पण महायुतीत फडणवीसांची कसोटी लागणार
WhatsApp Image 2025 03 03 At 9.42.24 PM
सीआयडीने हा जो व्हिडिओ पुरावा म्हणून जोडला आहे. त्यातील हे काही स्क्रीनशॉट काढले आहेत. त्यानंतर ज्या व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांचे चेहरे मॅच करून बघितले असता ते मॅच होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या फोटोंमध्ये देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. त्यांच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढले जात आहेत.
‘ती पुन्हा जिवंत होईल!’ पाळीव मांजर मेली, महिलेनं 2 दिवसानंतर उचललं टोकाचं पाऊल
WhatsApp Image 2025 03 03 At 9.42.25 PM
त्यामुळे सीआयडीने जोडलेल्या या परिशिष्टातील काही फोटो किंवा व्हिडिओ अगदी त्यांच्या जवळ जाऊन काढण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा कनवभाव नव्हता त्यांना मारत असताना एक जण हसत सेल्फी काढत होता. तर एक जण त्यांचा शर्ट काढत असतानाच देखील फोटो आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत राक्षसी असं हसू दिसत आहे. त्यानंतर त्यांचे सर्व कपडे काढण्यात आल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते अत्यंत रक्तबंबाळ अवस्थेत आहेत त्यांना मारहाण झालेले आहे.
WhatsApp Image 2025 03 03 At 9.42.25 PM (1)
काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा
तरीही त्यांच्या खांद्याला पकडून त्यांच्यासोबत एक सेल्फी काढताना हे मारेकरी दिसत आहेत तर एका फोटोमध्ये थेट काळजाचा थरका पुरतो तो म्हणजे त्यांच्या पाठीवर रॉडने मारहाण करतात ना दिसत आहे. तसेच शेवटी या व्हिडिओमध्ये त्यांना गाडीच्या समोर बसवून त्यांच्या चेहऱ्यावर लघु शंका करतानाही दिसत आहे. त्यामुळे त्यांची हत्या झाली असतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो अखेर मॅच करून बघून सीआयडीच्या तब्बल तीन हजार पानांच्या दोषारोप पत्रांमध्ये पुरावा म्हणून जोडण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची धार आणखी तीव्र झाली आहे.
WhatsApp Image 2025 03 03 At 9.42.23 PM (1)