‘ती पुन्हा जिवंत होईल!’ पाळीव मांजर मेली, महिलेनं 2 दिवसानंतर उचललं टोकाचं पाऊल

Woman End Life After Death Of Pet Cat In UP : मानवांच्या प्राण्यांवरील प्रेमाच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण ही घटना घडल्यानंतर तुम्हाला मोठा धक्काच बसेल. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अमरोहा जिल्ह्यातील आहे. तिथे एका मांजरीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी महिलेनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी (Woman End Life) पाठवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर कोतवालीच्या मोहल्ला राहरा अड्डा येथील 32 वर्षीय पूजाचा विवाह सुमारे 8 वर्षांपूर्वी दिल्लीतील एका तरुणाशी झाला होता. लग्नाच्या फक्त दोन वर्षांनी त्यांचा घटस्फोट (Uttar Pradesh News)झाला. यानंतर ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहू लागली. एकटेपणावर मात करण्यासाठी पूजाने एक मांजर पाळली होती.
काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी मांजरीचा मृत्यू झाला. जेव्हा पूजाच्या आईने तिला मांजरीचा मृतदेह पुरण्यास सांगितले तेव्हा पूजाने नकार दिला. पूजा म्हणाली की, तिची लाडकी मांजर जिवंत होईल. पूजाची आई गजरा देवी यांनी सांगितलं की, पूजाने मांजरीचा मृतदेह दोन दिवस स्वत:जवळ ठेवला होता. तिसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या आशा धुळीस मिळाल्या, तेव्हा पूजाने तिसऱ्या मजल्यावरील तिच्या खोलीत जाऊन छताच्या पंख्याला गळफास घेतला.
‘…अशी खिल्ली उडवणं लज्जास्पद’, व्यंकटेश प्रसाद यांनी दिला रोहित शर्माला खुला पाठिंबा
काही वेळाने, जेव्हा आई पूजाच्या खोलीत पोहोचली. तेव्हा तिला पूजाचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. यानंतर त्यांनू परिसरातील लोकांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. सोशल मीडियावरील या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो की, एखाद्या प्राण्याच्या प्रेमात कोणी इतके वेडे कसे असू शकते की त्याच्या मृत्यूनंतर तो आत्महत्या करतो.