Download App

पवारांचे थेट वार! अजितदादांचे मुख्यमंत्रीपद स्वप्नचं राहणार; UN चा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी…

  • Written By: Last Updated:

मुंबई : भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ असे म्हणत प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक विधान केले आहे. तर अजित पवार हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी एक टोलाही लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असून, ही न घडणारी गोष्ट आहे. अजित पवार यांना निवडणुकीत स्वीकारायचं की नाही हे लोकच ठरवतील, असेही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल अजितदादांनी लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केले. ते म्हणाले की, यूएनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी हरकत नाही असा टोलादेखील पवारांनी लगावला आहे. ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar On Ajit Pawar CM Post)

Chitra Wagh : तुमची चॉईसचं वेगळी आहे…; मोठ्या ताई म्हणत चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर ‘वर्मी’ घाव

भुजबळांनी खोट बोलल्याचे मान्य केले

यावेळी छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवरदेखील पवारांनी पलटवार करत भुजबळांनी खोट बोलल्याचे मान्य केले. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नसल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. त्यापुढची जी पायरी होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती असे म्हणत आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे पवार म्हणाले.

Supriya Sule : ‘त्या’ डायरीत नेमकं काय? सुळेंनी सांगितलं आणखी एक ‘राजकीय’ सत्य

भाजपविरोधात जे एकत्र येणार त्यांना सर्वांना सोबत घेणार 

भाजपविरोधात बंड पुकारत देशभरातील प्रमुखपक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. यात पुढील काळात कोणा कोणाचा समावेश होणार असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षाची आघाडी आहे. यात काही आणखी शेतकरी कामगारपक्षासारखे पक्षही येतील असे यावेळी पवारांनी स्पष्ट केले.

Tags

follow us