Supriya Sule : ‘त्या’ डायरीत नेमकं काय? सुळेंनी सांगितलं आणखी एक ‘राजकीय’ सत्य

Supriya Sule : ‘त्या’ डायरीत नेमकं काय? सुळेंनी सांगितलं आणखी एक ‘राजकीय’ सत्य

Supriya Sule : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर (NCP Crisis) पक्षातील दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. शाब्दिक टीकाच नाही तर दोन्ही गटांची लढाई न्यायालय आणि निवडणूक आयोगात पोहोचली आहे. येथेही जोरदार युक्तिवाद सुरू आहेत. त्यातच आता अजित पवार गटाचे नेते राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीत बंड होण्याआधी काय घटना घडल्या होत्या, याचा खुलासा केला. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या या दाव्यांवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर देत भुजबळांचे सगळेच दावे खोडून काढले आहेत. तसेच त्यांनी एका डायरीचा दाखला दिला. या डायरीत नेमकं काय लिहिलं आहे याचाही खुलासा सुळेंनी केला.

सुळे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. सुळेंना भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत विचारल्यावर त्यांनी काही कागद बाहेर काढले. त्यावर काही मुद्दे लिहिलेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक डायरीचाही उल्लेख केला.

‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’; घटनाक्रम सांगत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

सुळे म्हणाल्या, मी रोज एक डायरी लिहिते. दिवसभरात ज्या गोष्टी घडतात त्या मी डायरीत लिहून ठेवते. त्यामुळे मी कालच्या मुलाखतीतील प्रत्येक गोष्ट लिहून आणली आहे. मी थिअरी म्हणून लिहित नाही. सवय म्हणून लिहिते. त्यामुळे 2 जुलैच्या शपथविधीच्या वेळी काय घडलं हे मी सांगू शकते. मला आठवत नाही असं मी म्हणत नाही. माझी डायरी माझा रेफरन्ससाठी आहे. त्यामुळे स्फोट काही होणार नाही. स्फोट होईल असं माझ्या आयुष्यात काही नाही. माझं लाइफ फार बोअरिंग आहे, असे सुळे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, भुजबळ यांनी मुलाखतीत कबुली दिली आहे की अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी हे दोन्ही निर्णय शरद पवारांना अंधारात ठेऊन घेण्यात आले. यावर अनेकदा चर्चा होते. पण, भुजबळ यांच्या मुलाखतीतून स्पष्ट होते की हे दोन्ही निर्णय शरद पवार यांना अंधारात ठेऊन घेण्यात आले.

Chhagan Bhujbal : ..म्हणून शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; भुजबळांनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं?

भुजबळांनीच पवारांना आग्रह केला

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जनता, पक्षाचे कार्यकर्ते सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केली. त्यावेळी पवार स्वतः म्हणाले होते की तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. त्यावेळी भुजबळ म्हणाले होते कमिटी वगैरे काही चालणार नाही तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. भुजबळांनीच पवारांना अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह केला होता, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube