Download App

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट; म्हणाल्या संघर्षाच्या या काळात..

  • Written By: Last Updated:

Supria Sule Emotional Post For Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस असून, राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये पवारांची लेक असणाऱ्या सुप्रिया सुळेंची (Supria Sule) एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील म्हणजे शरद पवार (Supria Sule) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास असल्याचे सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शेटजी-भटजींचा भाजप गोपीनाथ मुंडेंनी बहुजनांचा केला…

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?

आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती. मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.

Anil Parab : केसरकरांनी बाळासाहेबांनाच खोटं ठरवलं; अनिल परबांचा घणाघात

कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे.

Disha Salian: दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT ची स्थापना; सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश

आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

अजितदादांना काकांच्या वाढदिवसाचा विसर?

बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी विविध सभा, भाषणं, पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर टीका केली. मध्यंतरीच्या काळात राजकारणातील मतभेद आणि नाते या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याचे स्वतः अजितदादांनी स्पष्ट केले होते. मात्र, हे विधान प्रत्यक्षात उतरताना दिसून येत नाहीये. कारण एकीकडे शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त तळागाळातील लोकं शुभेच्छा देत आहेत, तर पवाराचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापपर्यंत पवारांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत. विशेष म्हणजे अजित पवारांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करत अभिवादन केले आहे. एवढेच नव्हे तर, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या सर्वांमध्ये अजितदादांना शरद पवारांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळे अजितदादांना काकांच्या वाढदिवसाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us