Disha Salian: दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT ची स्थापना; सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश

Disha Salian: दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT ची स्थापना; सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश

SIT For Disha Salian Case: दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आजच SIT ची स्थापना होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोंडीत पकडण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. तर गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा उचलून धरला होता.

दरम्यान, विरोधी बाकावरील नेत्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आवाज उठवत आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याचे बघायला मिळाले होते. नुसते आरोपच नाहीतर त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जोर लावून धरली होती. दरम्यान राज्य सरकार या प्रकरणी पुन्हा एकदा पाऊलं उचलताना बघायला मिळत आहे. त्यामुळे आता दिशा सालियान या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत(Sushant Singh Rajput) याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्याआधी दिशा सालियान (Disha Salian) हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या सगळ्या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात होते. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशीचीही मागणी वारंवार केली जात होती. भाजप नेत्यांकडून हे प्रकरण उचलून धरण्यात आले होते.

त्यानंतर आता राज्य सरकारने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. चौकशीत काही माहिती समोर येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

Rahul Kanal : दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल पुन्हा… पक्षप्रवेश करताच राहुल कनालांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

नेमकं काय घडलं होतं ?

दिशा सालियान अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक होती. 8 जून 2020 रोजी मुंबईत घराच्या बाल्कनीतून खाली पडून तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येची नोंद केली होती. पण तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह सुद्धा मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube