Sharad Pawar NCP and UBT regional Party Election Commissions Decision : देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commissions) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) त्यांच्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा (regional Party) दर्जा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या अजित पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून या पक्षाला देखील आता प्रादेशिक पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
‘दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत’; विशाळगड हिंसाचाराबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य
पुढील काही महिन्यात महाराष्ट्रसह हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या पक्षाला नाव आणि चिन्हासाठी लढा द्यावा लागला होता.
छोटा भाऊ होणार की वादाचा नवा अंक सुरू करणार? चीन मित्र ‘ओलीं’च्या हाती नेपाळचं पॉलिटिक्स
त्यानंतर या पक्षांना चिन्ह मिळालं तर आता निवडणूक आयोगाकडून या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाकडून कोणत्याही पक्षाला प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मातांची संख्या लक्षात घेतली जाते यासाठी 1968 चा पक्षचिन्हाने पक्षाच्या नियमांचा निकष ग्राह्य धरला जातो.
तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र झटका बसला आहे. कारण या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. तर यामध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.