Download App

शिखर बॅंकेचा उल्लेख करण्याची गरजच नव्हती कारण.., मोदींच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

Sharad Pawar Speak on Shikhar Bank Scam : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिखर बॅंकेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती कारण मी कुठल्याही बॅंकेचा सदस्य नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.

शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करा, समान नागरी कायद्यावर शरद पवारांनी ठेवलं बोट…

दरम्यान, मध्यप्रदेशात झालेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली होती. त्यामध्ये शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर आता शरद पवारांनी मोदींवर नेम धरला आहे.

देशात रुग्णालयांपेक्षा मंदिरं जास्त…; IIT पवईच्या अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

शरद पवार म्हणाले, शिखर बॅंकेचाच काय मी कोणत्याही बॅंकेचा सदस्य नाही. आमचा कुठल्याही संस्थेशी संबंध नसून मोदींना शिखर बॅंकेचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्याची फसवणूक, शैक्षणिक कर्जाच्या नावावर ३७ लाखाचा गंडा; कागदपत्रावर उचलले वैयक्तिक कर्ज

पंतप्रधान मोदींनी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख करत घोटाळ्याचा आरोप केला होता. यावेळी बोलताना मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं होतं. त्यावरही भाष्य करीत पवारांनी मोदींना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे.

माझी मुलगी स्वत:च्या कर्तुत्वावर लोकसभेवर 3 वेळा निवडून आली असल्याचं पंतप्रधान मोदींना उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना इतरही घडामोडींवर शरद पवारांनी भाष्य करीत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. समान नागरी कायदा, राज्यात वाढत चाललेला हिंसाचार, महिलांवरील अत्याचाराच्या घटना, भाजपची किती राज्यात सत्ता? या मुद्द्यांवर भाष्य करीत पवारांनी भाजपवर टीका केल्याचं दिसून आले आहेत.

Tags

follow us