सातारा ZP सत्तेचा सस्पेन्स; राष्ट्रवादी-शिवसेनेचे 36 सदस्य आज थेट सभागृहात, भाजपचा गेम होणार का?

गेल्या तब्बल 35 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवलं असल्याची माहिती समोर येत आहे.

Untitled Design 58

Untitled Design 58

Strong movements to form government in Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज हिवणार आहे. सत्तेच्या समीकरणाबाबत मोठे सस्पेन्स निर्माण झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीच्या काँग्रेस आणि भाजप यापैकी कोणत्याही पक्षाकडून अद्याप स्पष्ट संकेत दिले गेलेले नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात पडद्यामागे अत्यंत गोपनीय पद्धतीने सत्तेचा खेळ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या तब्बल 35 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवलं असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही पक्षांचे मिळून 36 सदस्य आज थेट सातारा जिल्हा परिषद सभागृहात दाखल होऊन सत्ता स्थापन करणार का, की शेवटच्या क्षणी या सदस्यांपैकी काही जण फुटून भाजपसोबत जाणार आणि सत्तेचं गणित बदलणार, याकडे सर्वच लक्ष लागलं आहे.

सातारा जिल्हा परिषदेत सध्या पूर्णपणे सस्पेन्स आणि सिक्रेट गेम सुरू असल्याचं चित्र आहे. सत्ता समीकरणांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. साताऱ्याच्या राजकारणात आज मोठा स्फोट होणार का, याची उत्सुकता देखील वाढली आहे.

लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना करमणुकीत गुंतवलं जातंय, राज ठाकरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

भाजप हा आकडेवारीनुसार सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना मिळून बहुमताची मॅजिक फिगर पार करण्याइतपत संख्याबळ दिलं आहे. दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वीच दावा केला होता की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत आणि आम्हाला कोणत्याही वेगळ्या प्लॅनची गरज नाही. मात्र आज हा दावा खरा ठरणार का, की शेवटच्या क्षणी सत्तेचं समीकरण उलटणार, ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या निवडीत चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली होती. मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 27 जागांवर विजय मिळवला आहे. एका अपक्ष सदस्याने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सध्या भाजपचे संख्याबळ 28 वर पोहोचले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा आजच्या मतदानातून होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेत एकूण 65 सदस्य असून सत्तेसाठी 33 या मॅजिक फिगरची गरज आहे. पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजपकडे 27 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15 तर काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्रत्येकी 1 सदस्य आहे. याशिवाय एक अपक्ष सदस्य आहे. त्यामुळे आजच्या मतदानानंतर सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची गादी नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार, आणि विरोधी बाकावर कोणाला बसावं लागणार, याकडे सम्पपूर्ण सातारकारांसह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version