लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना करमणुकीत गुंतवलं जातंय, राज ठाकरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

चित्रपट, आयपीएल आणि सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांना व्यक्त ठेवले जाते. लोकांनी आधी इंस्टाग्राममधून बाहेर पडायला हवे.

  • Written By: Published:
Untitled Design 56

Raj Thackeray’s serious allegations against the government : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापनदिन मोठ्या यत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकांनी सत्तेला प्रश विचारू नयेत यासाठी त्यांना सतत करमणुकीची गुंतवून ठेवलं जात आहे. चित्रपट, आयपीएल आणि सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांना व्यक्त ठेवले जाते. लोकांनी आधी इंस्टाग्राममधून बाहेर पडायला हवे. लोकं मोबाईलमध्ये आणि करमणुकीची अडकून राहिले तर कुणीही प्रश्न विचारणार नाही, असे ते म्हणाले. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर जगभरात दिसत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

राज ठाकरे यांनी माध्यमांवर देखील टीका करताना म्हटलं की, सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे माध्यमांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. पूर्वी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे, मात्र आता निषेध हा फक्त मोबाईलवर व्यक्त केला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना त्यांनी कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, तर आज तेच कर्ज ११ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. राज्याला तीन ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र आपण नेमके कुठे चाललो आहोत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

शिवराय असते तर विधानसभेत जावून कापून काढले असते; राज ठाकरे मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर बरसले !

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यात तीन वेळा कर्जमाफी झाली, तरी देखील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. या भाषणादरम्यान त्यांनी महाराष्ट्राच्या घडणीत योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांचा गौरव केला. त्यामध्ये छरत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, केशव हेडगेवार, व्ही. के. राजवाडे, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या व्यक्तिमत्वांची नावं घेतली. आपण या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, मात्र त्यांच्या विचारांचा स्वीकार करत नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या भविष्यासंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नेस्ट या नव्या वेबसाईटची घोषणा केली. या वेबसाईटवर शेती, आरोग्य, वाहतूक यांसह एकूण 27 विषयांचा समावेश असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये पर्याय उपलब्ध असणार आहे. राज्याच्या विकासासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना या प्लॅटफॉर्मवर मांडाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. आपण येथे आहोत ते महाराष्ट्रासाठी आहोत. भविष्यात ही सत्ता आपल्याला घ्यायची आहे आणि आपण ती घेणारच, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us