भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांवर यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर शास्त्री महाराज श्री क्षेत्र भगवानगड येथे भाविकांची भेट घेणार असून, त्याची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

News Photo   2026 08 08T215646.526

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांवर यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य (Namdev Shastri) डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना अचानक छातीत त्रास जाणवल्याने त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

शास्त्री महाराज यांच्यावर अहिल्यानगर येथील इंपल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, डॉ. सुहास हरदास, डॉ. संदीप गाडे आणि डॉ. महेश घुगे यांच्या देखरेखीखाली पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

Video : अखेर नामदेव शास्त्री महाराजांना उपरती झाली; म्हणाले, देशमुख कुटुंब भेटल्यानंतर मला

शास्त्री महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना सध्या विश्रांतीची आवश्यकता असल्याने भाविक व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात येऊ नये, तसेच डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाशी भेटीसाठी संपर्क किंवा विनंती करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर शास्त्री महाराज श्री क्षेत्र भगवानगड येथे भाविकांची भेट घेणार असून, त्याची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शास्त्री महाराजांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सेवाभावाबद्दल श्री क्षेत्र भगवानगडाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Exit mobile version