वाचाळवीर… शास्त्री महाराजांचं वक्तव्य जातीयवादी! मराठा समाज संतापला

वाचाळवीर… शास्त्री महाराजांचं वक्तव्य जातीयवादी! मराठा समाज संतापला

Maratha Samaj Aggressive After Mahant Namdev Shastri Statement : मंत्री धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी (Mahant Namdev Shastri) केलंय. त्यानंतर मराठा समाजात (Maratha Samaj) मोठं संतापाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) भगवानगडावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती. त्यानंतर नामदेव शास्त्रींनी पहिल्यांदाच या हत्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याच्या समोर आले होते. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांनी देखील नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध असलेले पुरावे नामदेव शास्त्री यांना दाखवले होते.

अबब! राज्यात तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक; मुंबईकर पहिल्या तर, चोखंदळ पुणेकर दुसऱ्या स्थानी

यावेळी प्रशासनाने या प्रकरणाचा छडा लावावा, असं सांगून देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी भगवानगड असल्याचं देखील बोलले होते. परंतु, आता या प्रकरणानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची केलेले पाठराखण तसेच त्यांचे वक्तव्य यावर आक्रमक होऊन नामदेव शास्त्री यांचा निषेध नोंदवला आहे.

अनमोल बिश्नोई… व्हिडिओ कॉल अन् बाबा सिद्दीकींची हत्या, मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

आज अहिल्यानगर शहरातील अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचे आणि त्यांनी केलेले वक्तव्य जातीयवादी आहे. या वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोचून भावना दुखावल्या आहेत, असं मराठा समाजाने म्हटले आहे. मराठा समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल भगवानगडाचे वाचाळवीर महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेअक्कल आणि जातीयवादी आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोचून भावना दुखावल्या आहेत.

महंत नामदेव शास्त्री यांच्या बोलण्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या भावना तिव्र झाल्या आहेत. त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केलेले आपले वक्तव्य मागे घ्यावे. जर त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचं असल्याचं मराठा समाजाने म्हटलंय. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर समाजात मोठी संतापाची लाट आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube