अबब! राज्यात तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक; मुंबईकर पहिल्या तर, चोखंदळ पुणेकर दुसऱ्या स्थानी

अबब! राज्यात तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक; मुंबईकर पहिल्या तर, चोखंदळ पुणेकर दुसऱ्या स्थानी

Two Lakh Financial Fraud Case In Maharashtra 2024 :  राज्यात मागील वर्षी तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. यामध्ये पहिला क्रमांक मुंबईचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीची 2,19,047 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 38 हजार कोटी रुपयांची फसवणूक (Financial Fraud Case )झाली आहे. आकडेवारीनुसार, आर्थिक फसवणुकीच्या सर्वाधिक घटना मुंबईत झाल्या आहेत. 2024 मध्ये मुंबईत (Mumbai) आर्थिक फसवणुकीची 51,873 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामध्ये 12,404.12 कोटी रुपयांची फसवणूक झाली.

सुरेश धसांच्या तक्रारींची दखल; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना दणका

पुणे शहरात 2024 मध्ये 22,059 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 5122 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  पुणे जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर त्यात 42,802 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी पिंपरी चिंचवडमध्ये 16115, ग्रामीण भागात 4628 गुन्हे दाखल झालेत. यामुळे अनुक्रमे 3,291 कोटी आणि 434 कोटी रुपयांचे नुकसान (Fraud Case In Maharashtra) झाले. आर्थिक फसवणुकीबाबत सरकारने सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

ठाणे शहरात 20,892, नवी मुंबईत 13,260 आणि ठाणे ग्रामीण भागात 1236 प्रकरणं आढळले आहेत. एकूण 8,583 कोटी रुपयांची फसवणूक झाली. मीरा भाईंदर आणि वसई विरारमध्ये आर्थिक फसवणुकीचे 11,754 गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे 1431 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नागपूर शहरात 11,875 तर नागपूर ग्रामीणमध्ये 1620 प्रकरणे नोंदली गेली आहेत. नाशिकमध्ये या आकडेवारीत 9169 प्रकरणे आणि 1047 कोटी रुपयांच्या नुकसानीचा समावेश आहे.

शिर्डीत एकाच इमारतीत 7 हजार मतदार कसे? राहुल गांधींनी लोकसभेत विचारला जाब…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 543.61 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या 6,090 प्रकरणांची नोंद झाली आहे, तर अमरावती जिल्ह्यात 223.059 कोटी रुपयांच्या 2,778 प्रकरणांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात 4,837 तर अमरावती शहरात 1,819 रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 3,457 गुन्हे दाखल झाले असून, अशा फसवणुकीत लोकांचे 394.54 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

इतर जिल्ह्यांमध्ये, बुलढाणामध्ये 1,531, चंद्रपूरमध्ये 1,792 आणि लातूरमध्ये 1,624 प्रकरणे नोंदवली गेली. ज्यात अनुक्रमे 239.19 कोटी रुपये, 175.39 कोटी रुपये आणि 240.45 कोटी रुपये आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित संशयास्पद व्यवहारांची तक्रार करण्याचं आवाहन केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube