परिक्षा कोणतीही नोकरभरतीची असो पेपरफुटीचे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या ऑनलाईन परिक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. गैरप्रकार प्रकरणी म्हसरुळ परिसर केंद्राबाहेरुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून मोबाईल, टॅब, हेडफोन जप्त करण्यात आले आहेत. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
परळीत मुंडेंना पर्याय सापडला? 700 गाड्यांसह शक्तिप्रदर्शन करत शिलेदार पवारांच्या गटात
नाशिकच्या म्हसरुळ परिसरात एका केंद्र परिसरात एका तरुणाला पोलिसांनी पकडलं आहे. या तरुणाकडून पोलिसांनी वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत. आजपासून राज्यातल्या विविध जिल्ह्यांत तलाठी परिक्षेला सुरुवात झाली आहे. परिक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात आली होती. मात्र, आरोग्य भरतीवेळी जो गोंधळ झाला, अगदी तसाच गोंधळ सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Sai Lokur: कुणी तरी येणार गं! बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज
नागपुरमध्येही पेपर फुटलायं; आमदार रोहित पवारांचा दावा
राज्यातील विविध जिल्ह्यांतील परिक्षा केंद्रावर तलाठी भरतीची परिक्षा सुरु असून नाशिकनंतर नागपुरमध्येही परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यानी आधीच दिशाभूल न करता पेपरफुटीवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती. शाससाने लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही आमदार रोहित पवारांनी दिला आहे.
Video : शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला माकडांनी केला चितपट; थरारक व्हिडीओ आला समोर
म्हसरुळ परिसरातील ऑनलाईन परिक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मोबाईलमध्ये संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता तलाठी भरतीमध्येही पेपर फुटल्याचं स्पष्ट झालयं. अद्याप या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून या गैरप्रकारामध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, राज्यात मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु असल्याचंही समोर आलं आहे.