Download App

वयाच्या १६ व्या वर्षी ‘RSS’मध्ये कामाला सुरूवात; दोनवेळा खासदार, आता महाराष्ट्राचे राज्यपाल

महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी राज्यपाल नियुक्त तसच काही ठिकाणी बदली करण्याता आली. महाराष्ट्रात आलेले सी पी राधाकृष्णन कोण आहेत?

  • Written By: Last Updated:

C. P. Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Radhakrishnan) सी.पी. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. आता त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार, वाचा सविस्तर यादी

कोण आहेत राधाकृष्णन?

राधाकृष्णन हे सध्या ६७ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूर तामिळनाडूमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच जनसंघासाठी काम करत आले आहेत. ते कोइमतूर मतदारसंघातून 1998 आणि 1999 मध्ये लोकसभेवर दोनदा निवडून गेले होते. तसंच, भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रं होती.

आरएसएससी संबंधीत

या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेले सी.पी. राधाकृष्णन दोन वेळा लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत. राधाकृष्णन 1973 पासून आरएसएस आणि जनसंघाशी संबंधित आहेत.

भारताला दोन पदकं जिंकण्याची संधी, दुसरा दिवस ठरणार ऐतिहासिक? वाचा, आजचं वेळापत्रक
सी.पी. राधाकृष्णन हे मूळचे तिरुपूर, तामिळनाडूचे आहेत. त्यांनी बीबीए मध्ये पदवी घेतली आहे. तामिळनाडूच्या विकासासाठी त्यांनी अनेक स्तुत्य कामं केली आहेत. ज्यामध्ये त्यांनी सर्व नद्या जोडण्यासाठी प्रयत्न केले, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये भाग घेतला, सर्वांसाठी समान नागरी कायद्यावर भर दिला आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठीही प्रयत्न केले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट देऊन मैदानात उतरवलं होतं आणि दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. 2004, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मात्र, त्यांचा पराभव झाला.

follow us