शिंदे गटाच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं! आज उद्धव ठाकरेंची ‘शिवगर्जना’ सभा

नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना सभेमुृळे नाशिकमधील शिंदे गटाच्या नेत्यांंचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंचा बाण कोणावर असणार याकडं सर्वांचचं लक्ष लागून राहिलं आहे. कर्जतचे राजकारण तापले : राम शिंदे यांची बैठक तर अजितदादा दौऱ्यावर मालेगावातील […]

Udhav Thackeray

Udhav Thackeray

नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना सभेमुृळे नाशिकमधील शिंदे गटाच्या नेत्यांंचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंचा बाण कोणावर असणार याकडं सर्वांचचं लक्ष लागून राहिलं आहे.

कर्जतचे राजकारण तापले : राम शिंदे यांची बैठक तर अजितदादा दौऱ्यावर

मालेगावातील मसगा मैदानात ही सभा पार पडणार असून भव्य दिव्य व्यासपीठासह 1 लाखांपेक्षा अधिक कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलीय. सभेच्या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत मालेगावात आधीच तळ ठोकून बसले आहेत.

लष्करे खून प्रकरणी पाच जणांची जन्मठेप कायम !

सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये पहिलीच सभा पार पडणार असून विशेष म्हणजे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा असणार आहे. दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आहेत. याकडे नाशिकच्या जनतेसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

याददाश्त कमजोर होना कोई बुरी बात नहीं; शेरेबाजीतून फडणवीसांचा विरोधकांना टोला

दरम्यान, खासदार राऊत आणि विनायक राऊत यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेत्यांनी या सभेसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त सभा संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभा होणार असल्याची माहिती समोर येतेयं.

‘साब ये लडका बडा होके….’ कुशल बद्रिकेनं सांगितला लहानपणीचा किस्सा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला आस्मान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे मालेगावात काय बोलणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version