Ahmednagar News : अहमदनगर शहरातील (Ahmednagar City) उड्डाण पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट ब्लॉक घेऊन पुणेकडे जाणारा एमएच 14 इएम 9199 ट्र्क उड्डाणपुलाच्या कठड्यावर पलटी झाला आहे.
माहितीनुसार, या अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक पलटी झाल्यानंतर हे सर्व सिमेंट ब्लॉक खाली कोसळले सुदैवाने खालून कुठलाही वाहन चालक किंवा पादचारी जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
काही दिवसांपूर्वी देखील या वळणावरून ट्रक खाली कोसळला होता. या दुर्घटनेत एक जणांचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट रात्री साडेनऊच्या दरम्यान सिमेंट ब्लॉक घेऊन पुणेकडे जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याच वळणावर पलटी झाली.
‘मी शरद पवारांना नेता मानतो पण नाईलाजाने…’, राजेंद्र शिंगणे देणार अजित पवारांना धक्का?
या ट्रकमध्ये सिमेंट ब्लॉक होते ट्रक उलटल्यानंतर हे सर्व सिमेंट ब्लॉक खाली कोसळले. सुदैवाने खालून कुठलाही वाहन चालक किंवा पादचारी जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
UPI मध्ये बदल, बँक खात्याशिवाय होणार पेमेंट, ‘या’ लोकांना मिळणार फायदा