‘मी शरद पवारांना नेता मानतो पण नाईलाजाने…’, राजेंद्र शिंगणे देणार अजित पवारांना धक्का?
Rajendra Shingne : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात. माध्यमांशी बोलताना शरद पवार आपले नेते आहे आणि गेल्या अडीच वर्षापासून नाईलाजाने अजित पवारांबरोबर आहे असं वक्तव्य त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी जर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश केला तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना मोठा धक्का बसू शकतो. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काही नेत्यांनी अजित पवार यांना राम राम ठोकून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता.
माध्यमांशी बोलताना राजेंद्र शिंगणे म्हणाले की, सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्ताने मी येथे आलो, या समितीत असल्याने मी येथे आज हजर राहिलो. आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली मात्र राजकीय कोणतीही चर्चा झाली नाही.
मी जरी अजितदादांच्या गटात सामील झालो असलो तर मागच्या दोन – अडीच वर्षांपासून शरद पावरांशी संबंध तोडले असं काही भाग नाही. मी आजही त्यांना नेता मानतो. असं माध्यमांशी बोलताना राजेंद्र शिंगणे म्हणाले.
तसेच मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. माझ्या राजकीय जीवनात त्यांचा मोठा वाटा आहे. मध्यंतरी जिल्हा सरकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला तीनशे कोटी राज्य सरकारने दिले आहेत परंतु नेहमीच पवार साहेब माझ्यासाठी आदरणीय राहतील असं देखील यावेळी राजेंद्र शिंगणे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा…विखेंचा विरोधकांना खोचक टोला
तर दुसरीकडे राजेंद्र शिंगणे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार का? याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.