Download App

विकासकाम झालीत अन् पुढं करत राहणार तुम्ही साथ द्या; राणाजगजितसिंह पाटलांचं मतदारांना आवाहन

दरम्यान, येथे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील हे प्रचाराला लागले आहेत. त्यांनी काल ढोकी येथील श्री.झुंबर आबा बोडके यांच्या

  • Written By: Last Updated:

Ranajgajitsinh Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता प्रचारासाठी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांचे आता उमेदवार फिक्स झाले आहेत. (Ranajgajitsinh Patil ) त्यानंतर आता प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुतीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला आहे. तर, महाविकास आघाडीमधून तुळजापूरची जागा काँग्रेस पक्ष लढवत आहे.

दरम्यान, येथे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील हे प्रचाराला लागले आहेत. त्यांनी काल ढोकी येथील झुंबर आबा बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यकर्ते वैभव पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या योजनांबद्दल मतदारांना माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी ढोकी येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथप्रमुखांशी संवाद साधल्याचं राणाजगजिसिंह पाटल यावेळी म्हणाले.

तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला

तुळजापूर मतदारसंघात आपण केलेले विविध विकासकामांची माहिती, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. तसंच, आपल्या मतदारसंघात जोमाने कार्य करून महायुती सरकारला प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे, अस आवाहनही पाटील यांनी यावेळी केल. तसंच, सिंदगाव, होर्टी, जळकोट येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठकही घेण्यात आली. या बैठकीत पक्षांची एकजूट, बलस्थाने, नागरिकांशी गाठीभेटी, संवाद व निवडणूक प्रचाराची दिशा यासंदर्भात राणा पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.

महायुती सरकार व आपल्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या परिसरातील सर्वाधिक मतदान करून घेण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी. महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करण्याची गरज असल्याचं आवाहानही पाटील यांनी यावेळी केलं. दरम्यान, गावोगावी आपण पाण्याच्या योजना जाहीर करणार असल्याचंही राणाजगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले आहेत.

follow us