Download App

Chandrapur : पोलिस वर्गमित्रानेच गळा आवळला; मृतदेह शौचालयाच्या टाकीत लपवला…

चंद्रपुरातील चिमुरमधील एका 37 वर्षीय महिलेची वर्गमित्र असलेला निलंबित पोलिस कर्मचारी नरेश डाहुले याने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडलीयं.

Chandrapur News : चंद्रपूरमधील चिमूरमध्ये बेपत्ता (Chandrapur) असलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह नागपुरमधील हरिश्चंद्र गावाजवळील निर्जनस्थळी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचा छडा वेगाने लावत नरेश डाहुले (Naresh Dahule) या निलंबित पोलिस कर्मचाऱ्याला अटक केलीयं.

पुन्हा शेतकरी आंदोलन, 14 डिसेंबरला दिल्लीला जाणार, शेतकरी संघटनेची घोषणा

नेमकं प्रकरण काय?
अरुणा काकडे (37) असं या मृत महिलेचं नाव असून काकडे देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका आहेत. 26 नोव्हेंबरला त्या नागपुरातील दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या काकडे घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

कुर्ला बस अपघात प्रकरण! मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवले. आरोपी निलंबित पोलिस कर्मचारी नरेश डाहुले आणि अरुणा काकडे हे दोघेही लहानपाणापासून एकाच शाळेत शिकले होते. 26 रोजी मृत महिला अरुणा काकडे आणि नरेश डाहुले नागपूरला गेले होते. त्याचवेळी दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला. हा वाद विकोपाला गेला त्यानंतर नरेश याने अरुणा यांचा गळा दाबून खून केला.

लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; नार्वेकरांचं अभिनंदन, अजित पवारांची टोलेबाजी

दरम्यान, आरोपीने खून केल्यानंतर मृतदेहा हरिश्चंद्र इथल्या एका निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाकीत लपवून ठेवला. त्यानंतर आरोपी नरेश फरार झाला. पोलिसांनी त्याचा कॉल रेकॉर्डच्या सहाय्याने शोध घेतला. आरोपी नरेश डाहुले याचा घरफोड्यांसारख्या केसमध्ये समावेश असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळेच त्याला मागील वर्षी पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

follow us