Download App

Eknath Khadase : …तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही; खडसेंचा अजितदादांवर ठाम विश्वास

  • Written By: Last Updated:

Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे माध्यमांशी बोलत असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सत्तेमध्ये सामील झालेले नेते अजित पवार यांच्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की दादांचा संघाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर त्यांनी कधीही संघाचा समर्थनही केलेले नाही. असं खडसे ठामपणे म्हटल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

माध्यमांशी संवाद साधत असताना एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, जातनिहाय जनगणनेवर महायुतीतील पक्षांचे एकमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जात निहाय जनगणनेच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘अजित पवार हे पहिल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंधित नाही. त्यांनी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थन केले नाही.

‘आधीच्या नेत्यांना मराठ्यांचं मत कळलं, पण मन कळलं नाही’; CM शिंदेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

त्यामुळेच ते संघाच्या शिबिराला गेले नाहीत. यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जात निहाय जनगणनेला विरोध केल्याचे देखील बातम्या समोर येत आहेत. मात्र त्याने भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण सरकारने जात निहाय जनगणनेवर जनगणना करणार असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच जोपर्यंत संघ जात निहाय जनगणनेवर भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही असा ठाम विश्वास यावेळी खडसेंनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे.

Sandeep Maheshwari vs Vivek Bindra : YouTube इतिहासातील सर्वात मोठा वाद, वाचा A To Z प्रकरण!

नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविले होते. यानुसार दोन्ही पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी हजेरी लावली. मात्र आपल्या पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे अजितदादा आणि त्यांच्या गटातील आमदारांनी कालच कळविले होते.

Tags

follow us