Gram Panchayat Election Result : तेलंगणाच्या (telangana)भारत राष्ट्र समिती अर्थात (BRS) पक्षानं ग्रामपंचायत निवडणुकीच्या Gram Panchayat Election Resultमाध्यमातून महाराष्ट्रात (Maharashtra)झेंडा रोवला आहे. बीआरएस पक्षाला भंडारा (Bhandara)जिल्ह्यासह बीड (Beed)जिल्ह्यामध्येही लोकांची पसंती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींवर तसेच बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao)यांच्या बीआरएस पक्षाने वर्चस्व राखले आहे. बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतही बीआरएसच्या ताब्यात आली आहे.
‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यापैकी निम्म्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आलेत. त्यात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटानं जोरदार मुसंडी मारली. मविआला मोठा धक्का बसला आहे.
त्याचबरोबर काही महिन्यांपासून बीआरएस पक्ष महाराष्ट्रात आपले हातपाय पसरु लागला आहे. अनेक राजकीय पक्षांनी बीआरएसचा चांगलाच धसका घेतला आहे. राज्यातील विविध पक्षातील राजकीय नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात बीआरएसला यश आलं आहे.
आत्मपरिक्षण करावे! विधेयके अडवून ठेवण्यावर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना फटकारले
भंडारा जिल्ह्यामध्ये 66 ग्रामपंचायतींपैकी आत्तापर्यंत 20 ग्रामपंचायतींचा निकाल समोर आला आहे. आत्तापर्यंत बीआरएसने चांगलीच बाजी मारली आहे. बीआरएसने भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसला धक्का देत भंडारा जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला आहे.
भाजप आणि काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत दोन दोन ग्रामपंचयतीत विजयश्री खेचून आणता आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवरही बीआरएसने आपला झेंडा फडकवला आहे.
गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झंडा फडकावला आहे. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शशिकला भगवान मस्के विराजमान झाल्या आहेत. के चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रात सुरुवात केली आहे.
आषाढी एकादशीला तेलंगणामधून तब्बल 300 गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ग्रँड एन्ट्री केली. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला.
केसीआर यांनी काही दिवसात महाराष्ट्रात अनेक सभा घेत शेतकऱ्यांना आश्वासनं दिली आहेत. त्याचबरोबर भाजपवर जोरदार टिकाही केली. त्यांनी मराठवाड्यातून महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात केली. अबकी बार किसान की सरकार असा नारा देत त्यांनी रणशिंग फुंकले आहे.