Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. खरं वॉशिंग मशीन तर शरद पवार यांच्याकडं आहे, असा गंभीर आरोप केला. एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गडकरी यांनी शरद पवारांवर हे आरोप केले आहेत.
नामदेव जाधव, म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार
नितीन गडकरी यांनी सांगितले की, आमच्याकडे अशी कोणतीही वॉशिंग मशीन नाही. खरं तर शरद पवार यांच्याकडेच असेल. कारण त्यांनी आयुष्यभरात अनेक राजकीय पक्षांमधून विविध नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. अनेकांना आपल्या पक्षात घेतलं आणि अनेकजण त्यांना सोडूनही गेले. हा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर असेल, असाही दावा नितीन गडकरी यांनी केला.
मी वाट पाहतोय! महादेव जानकरांसाठी मोदींचा खास संदेश; फडणवीसांनी जाहीर सभेतच सांगितला
शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते आणि ते स्वत: मंत्री होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाणही होते. त्यावेळी त्यांनी पुलोदचे सरकार स्थापन केले. त्यावेळी अनेक लोक त्यांच्यासोबत होते. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे देखील मंत्री होते.
त्यानंतर पवारांनी समाजवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पुढे काही काळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी त्यांचे सर्वच्या सर्व आमदार निघून गेले. त्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नवीन नेते आणले, पुन्हा नवीन पक्ष स्थापन केला. असाही खोचक टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवारांना लगावला.
त्याचवेळी दुसरीकडं गडकरींनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्या निर्दोष मुक्तता केल्याचे समर्थन केले आहे. प्रफुल पटेल हे दोषी नव्हते त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पटेल यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर त्यांच्यावर सक्तीची कारवाई करणार का? असा सवाल यावेळी गडकरी यांनी उपस्थित केला.
त्यांच्या चौकशीचा अहवाल आणि तपासाच्या आधारानुसार त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. पैसे कसे मिळाले? हे तु्म्ही झारखंडमध्ये पाहिले असेल. कोणावरही कारवाई करताना तपास यंत्रणांनी कोणावरही अन्याय केला असेल तर ते न्यायालयात जाऊ शकतात. आमचे सरकार कोणावरही सूडबुद्धीने कारवाई करत नाही, असेही यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.