कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत अवतरलं भाजपचं वॉशिंग मशीन, विरोधकांवर 51 खटले पण सत्ताधाऱ्यांना अभय
Pawan Khera on BJP : लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांवर जोरदार टीका-टिपणी केली जात आहे. त्यातच आज कॉंग्रेस (Congress)नेते पवन खेडा (Pawan Khera)यांनी पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली. त्याचवेळी पत्रकार परिषदेत बीजेपी वॉशिंग मशीन (BJP washing machine)ठेवण्यात आलं. आणि ते मशीन कसे काम करते? हेच यावेळी दाखवण्यात आले.
‘बागी 2’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, अभिनेता टायगर श्रॉफने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो
पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत एक समोर मशीन ठेवली होती, त्याला बीजेपी वॉशिंग मशीन नाव दिले होते. खेडा म्हणाले की, ज्या नेत्यांवर विरोधी पक्षात असताना हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप केला जातो, पण त्याच नेत्यांचा भाजपात प्रवेश झाल्यास त्यांची सगळी प्रकरणं भाजपकडून मागे घेतली जातात.
नाशिकसाठी माझं अचानक पुढं आलं, तिकीट मिळालं तर.. नाशिकच्या तिढ्यात भुजबळांची एन्ट्री!
खेडा यांनी सांगितले की, भाजपकडे अशी एक वॉशिंग मशीन आहे की, विरोधी पक्षातील नेत्यांवर 10 वर्षांपूर्वीची केस असली तरी देखील संबंधीत नेत्याने भाजपात प्रवेश केला तर तो आरोपी पूर्णपणे स्वच्छ होऊन बाहेर येतो. त्याचवेळी खेडा यांनी मोदी वॉशिंग पावडरवरुनही भाजवर निशाणा साधला आहे. तसेच सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स या संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी पवन खेडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वच्छ झालेल्यांची नावे मोजून दाखवली. त्यावेळी खेडा यांनी विरोधकांवरील 51 प्रकरणं मोजून दाखवली ज्यांच्यावर कारवाई सुरु आहे. त्याचवेळी दुसरीकडं भाजप नेत्यांवर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवरील 20 गुन्हे मोजून दाखवले, पण त्यांच्यावर सध्या कसलीही कारवाई केली जात नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले.
त्यात खेडा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांचे नाव घेतले. त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांच्याबद्दलही हाच प्रकार घडल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.