Download App

‘पवार साहेबांच्या मनात भाजप, त्यांच्या आशीर्वादानेच नवनीत राणांचा पक्षप्रेवश’; रवी राणांचा दावा

Ravi Rana replies Sharad Pawar : अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल मतदारांची माफी मागितली. यंदा ही चूक दुरुस्त करा, मी सुद्धा पुन्हा अशी चूक करणार नाही अशी ग्वाही त्यांनी अमरावतीकरांना दिली. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे होता. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असतानाच नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या. पवार साहेबांच्या मनात भाजपाच आहे. त्यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं. फक्त सुप्रियाताईंच्या हट्टामुळे त्यांना थांबावं लागलं, असे उत्तर रवी राणा यांनी दिले.

‘पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना सहकार्य केलं ही चूक’; शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली!

शरद पवार यांच्या सभेनंतर रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवर उत्तर दिले. ते म्हणाले, पवार साहेब आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत. पण नवनीत राणा भाजपात गेल्या त्या भाजपमध्ये पवार साहेबांचीही इच्छा होती. म्हणूनच त्यांनी अजितदादांना पाठवलं. पण, सुप्रियाताईंच्य हट्टापायी त्यांना कुठेतरी थांबावं लागलं. पण पवार साहेबांच्या मनात भाजपाच आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

पवार साहेब आणि माझे खूप चांगले संबंध आहे. त्यांच्या मनात भाजप आहे हे मला माहिती आहे. आज ते उद्धव ठाकरेंच्या दबावात बोलले असतील, असेही राणा यावेळी म्हणाले. रवी राणांचे हे वक्तव्य म्हणजे शरद पवारांनी अमरावतीकर मतदारांना जी भावनिक साद घातली. त्याचा महाविकास आघाडीला होणारा राजकीय फायदा कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

मेडिकल कॉलेजबाबतचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडेल, आमदार राणांचं ओमराजेंना आव्हान

काय म्हणाले होते शरद पवार ?

मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की, एक चूक माझ्याकडून झाली. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं. पण 5 वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की, कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही, असं शरद पवार काल अमरावतीमधील सभेत म्हणाले होते.

follow us