Download App

CM शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा कारनामा; भर मिरवणुकीत युवकाला काठीने झोडपले

Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikwad) पोलिसांच्या काठीने एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मिरवणुकी दरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून गायकवाड यांच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मिरवणुकीतील आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड एका युवकाला मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांनी युवकाला मारहाण केल्याचे दिसत आहे. पोलीस कर्तव्यावर असताना लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे कायदा हातात घेऊन मारहाण करणे योग्य नसल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार जर आली तर त्याची शहानिशा करून कायदेशीर बाबींची तपासणी करून गु्न्हा दाखल केला जाईल, अशी माहिती बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. आमदार संजय गायकवाड यांनी कोणत्या कारणासाठी भररस्त्यात मारहाण केली हे महत्वाचे नाही. गंभीर हे आहे की लोकप्रतिनिधीने कायद हातात घेऊन ड्युटीवरील पोलीस जवानाच्या काठीने एखाद्या भारतीय नागरिकाला अमानुष मारहाण करणे हा गंभीर गुन्हा नाही का, असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत.

Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

आमदार गायकवाड सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. याआधी त्यांनी एका कार्यक्रमात 37 वर्षांपूर्वी वाघाची शिकार करत त्याचा दात गळ्यातील माळेत घातल्याचे वक्तव्य केले होते. या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाबही नोंदवला होता. तसेच त्यांच्या गळ्यातल वाघाचा दात देहरादून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूटकडे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.ट

शेवटी हीच आहे मोदींची गॅरंटी : वडेट्टीवारांचा संताप 

या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली. किती बोलायचं. किती प्रकरणं रोज दाखवायची. या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही. मारहाण करणारा व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाबुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीचं विकासाचं राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यांनी झोडपून काढण्यापर्यंत पोहोचलं आहे असो… शेवटी हीच आहे मोदी की गॅरंटी !

दादागिरीची भाषा वापरू नये, अन्यथा पाय उखडून टाकू; रुपाली पाटलांचा संजय गायकवाडांना इशारा

follow us