MLA Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. आताही आमदार बांगर चर्चेत आले. बांगर यांचा एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बांगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला देतांना दिसत आहे.
Bhakshak: जस्मीत गौर बनून बॉलिवुडमधून सईने पुन्हा एकदा वेधलं लक्ष, पाहा फोटो
या व्हिडिओमध्ये आमदार बांगर हे आई-वडिल जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं सांगतांना दिसत आहे. बांगर हे त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांना शाळेला भेट दिली असता तेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे! pic.twitter.com/eF5a193BDW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2024
नेमंक काय म्हणाले बांगर?
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संतोष बांगर म्हणत आहेत की, ‘तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान न करता दुसरीकडे मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका. आई-वडिलांनी जर विचारलं का जेवयाचं नाही? तर त्यांना सांगायच आमदार संतोष बांगरला मदतान करा तेव्हा जेवते. नाहीतर जेवत नाही… संतोष बांगरला मत देण्यासाठी तुम्ही आग्रह धरा. आईवडिलांना सांगा बांगर यांनाच मत द्या, असं सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी संवादानंतर बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून वदवून घेतलं की, ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करणार?
दरम्यान, संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलेला हा अजब सल्ला सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ते सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत असतात. शिवसेनेत फुट पडली तेव्हा बांगर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिवीगाळ, मारहाण यांसारख्या अनेक प्रकरणात नाव आल्यामुळे बांगर नेहमीच चर्चेत असतात.