Download App

Rohit Pawar : अजितदादांचं वक्तव्य चुकीचंच; रोहित पवारांनीही रोखठोक सुनावलं

Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला होता. त्यांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राजकारणातूनही प्रतिक्रिया येत आहेत. आता अजित पवार यांचे पुतणे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचंच आहे, अशा स्पष्ट शब्दांत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Rohit Pawar यांना योग्यवेळी उत्तर देऊ, काहींना लवकर मोठं व्हायचं असतं; बावनकुळेंचा खोचक टोला

संघर्ष यात्रेच्या सांगतेनंतर आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. रोहित पवार म्हणाले, युवकांवर कुणीही शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत, तर ही सगळी गरीबांची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे जर ते सरकारकडे येत असतील, मदत घेत असतील तर त्याच चुकीचं काय असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का, ज्या मुलांकडं क्षमता आहे, बुद्धीमत्ता आहे. ती मुलं जर आर्थिक मदतीसाठी सरकारकडे येत असतील तर यात काहीच चूक नाही. कुणीही या युवकांवर शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा मी निषेध करतो.

अजित पवार काय म्हणाले होते ?

बार्टी, सारथी, महाज्योती संस्थेमार्फत अनेक विद्यार्थी फेलोशीप घेत असतात. राज्य सरकारकडून 29 मार्चला विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या शर्ती आणि अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, त्याआधीच 1329 विद्यार्थ्यांनी फेलोशीप मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचं नुकसान न होता त्यांना फेलोशिपचा लाभ मिळावा. राज्य सरकारने पुढील वर्षीपासून अटींची अंमलबजावणी करावी अशी मागणी सतेज पाटलांनी केली होती. त्यावर बोलताना अजित पवार आणि सतेज पाटलांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar : ‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’; अजितदादांनी सांगितलं पडद्यामागचं पॉलिटिक्स

अजित पवार म्हणाले, बार्टी, महाज्योती आणि सारथी संस्थांवर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांनी फेलोशीप निधी देण्याची मागणी सातत्याने होती. एवढ्या मुलांना खरंच पीएचडी करण्याची खरंच गरज आहे काय? त्यासाठी समिती नेमून त्याचा निर्णय घ्यायचा आहे. सारथी संस्थेमार्फत पीएचडीसाठी 200 विद्यार्थ्यांची संख्या आणि परदेशात जाण्यासाठी 75 विद्यार्थी, अशी संख्या करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.

फेलोशीप घेऊन काय करणार आहेत? पीएचडी घेतील ना दादा, त्यावर दादांनीही प्रतिसवाल करीत पीएचडी करुन काय दिवा लावणार आहेत, असं प्रत्युत्तर दिलं. त्यावरही सतेज पाटलांनी असं कसं म्हणता येईल दादा.. असं मिश्किल अंदाजात उत्तर दिलं.

follow us