Rohit Pawar यांना योग्यवेळी उत्तर देऊ, काहींना लवकर मोठं व्हायचं असतं; बावनकुळेंचा खोचक टोला

Rohit Pawar यांना योग्यवेळी उत्तर देऊ, काहींना लवकर मोठं व्हायचं असतं; बावनकुळेंचा खोचक टोला

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी अधिवेशना दरम्यान खोचक टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, ‘ रोहित पवांराना योग्यवेळी उत्तर देऊ. काही लोकांना लवकर मोठं व्हायचं असतं. पण राजकारणात आयुष्य जातं. मगच माणूस मोठे होतात.’ त्यांनी ही टीका, रोहित पवारांना बावनकुळे यांच्या कसिनोच्या फोटोवरून टीका केली. त्यामुळे केली आहे.

PM Modi : वसुंधरा, शिवराज अन् रमणसिंहांचं नावच नाही; पीएम मोदींचाही CM बदलाचा मूड?

रोहित पवार यांना खोचक टोला…

पत्रकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या कसिनोच्या फोटोवरून रोहित पवारांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला होता. यावेळी बावनकुळे म्हणाले की, माझ्या एका पारिवारीक दौऱ्यामध्ये असलेला फोटो कापून तो मॉर्फ करून तो कसिनोमधील फोटो बनवण्यात आला आहे. त्यावर मी अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच यावर रोहित पवांराना योग्यवेळी उत्तर देऊ. तसेच काही लोकांना लवकर मोठं व्हायचं असतं. पण राजकारणात आयुष्य जातं. मगच माणूस मोठे होतात. रोहित पवार यांच्या बाबत मी बोलणार नाही. पण आता अजित पवार यांना देखील इथपर्यंत पोहचण्यासाठी 37 ते 38 वर्ष लागली. असं म्हणत बावनकुळे यांनी रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.

Priyanka Chopra Deepfake: आलिया, दीपिका नंतर आता प्रियंका चोप्रा डीप फेकच्या जाळ्यात!

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांना आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कसिनोच्या फोटोवरून टोला लगावला होता. ते म्हणाल की, ‘राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधेयक आणलं जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. परंतु या सरकारने कॅसिनोच्या ‘महत्त्वाच्या’ विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं… हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ ‘अनुभवी’ नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावं, ही विनंती!’

काय आहे प्रकरण?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला होता. बावनकुळेंच्या याच कथित फोटोवर बोट ठेवत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना चांगलाच घेराव घातला होता. या फोटोची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावर खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

ते म्हणाले होते की, “मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे,” या शब्दांत आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज